Thursday, 10 January 2013

नियती

तिच्या नकळत तार अशी कोणी छेडिली
तिची काया अवघी सतार होऊन झंकारली
तिला कळलेच नाही असे काय होते
त्याच्या मनी मात्र सूर मारव्याचे होते!!

त्याला खूप काही तिला सांगायचे होते
पण त्यासाठी शब्द त्याचे अपुरेच होते
कितीही लाटा येऊन आदळल्या तरीही
सागराचे किनारे मात्र कोरडेच होते!!

त्याची वाट बघून मग तीही निघून गेली
तिची आठवण फक्त त्याच्यासावे राहिली
त्याच्या मनी स्वप्नांचे अनेक थवे होते
नियतीच्या मनी मात्र काही वेगळेच होते!!!!  

No comments:

Post a Comment